गौतमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत गुलाबराव जाधव सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न.
ओळख ज्ञानेश्वरीची एक परिवार या नाविन्यपूर्ण उपक्रमाची गौतमेश्वर विद्यालयांमध्ये झाला सुरू
व्यसनाधीनपणामुळे होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रसंग आपल्या व्याख्यानातून सांगताना डॉ. लक्ष्मण आसबे व उपस्थित सर्वांचे पानवले डोळे.
गोतंडी दि. ३१ जुलै रोजी गोतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतंडी या ठिकाणी कार्यरत असलेले जयवंत गुलाबराव जाधव सर हे गेली २७ वर्षे झाली. विद्यालयामध्ये कार्यरत असून आज त्यांचा कार्यकाल संपत असल्यामुळे विद्यालयाच्या वतीने जाधव सर यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ गोतमेश्वर मंगल कार्यालय ५४ फाटा या ठिकाणी आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीत गाऊन करण्यात आली. यावेळी कामधेनु परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण आजबे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकीचे प्राचार्य चव्हाण सर यांनी हिंदीतून जाधव सर यांना भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अमर बोराटे सर अंथुर्णे यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. गोतंडी गावचे पोलीस पाटील हरिभाऊ खाडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष दिनकर (नाना) नलवडे यांनी केले. आज पासून विद्यालयामध्ये ओळख ज्ञानेश्वरीची एक परिवार हा उपक्रम सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे सांगता पसायदान व वंदे मातरम ने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून ह.भ.प.हनुमंत महाराज, महादेवरत्न पारखी, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अडवोकेट विनायक नलवडे, सचिव जयश्रीताई नलवडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर, गणेशजी घोरपडे, जगन्नाथ पाटील, ज्ञानदेव काळे, माजी विद्यार्थी डॉक्टर वासुदेव पिसे, सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा, धुराजी शिंदे, सुभाष गायकवाड, शिवदास जाधव व विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले तर प्रास्ताविक मोरे सर यांनी केले.


