shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहर बेद्रे यांचा सन्मान

*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहर बेद्रे यांचा सन्मान.
   इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर महाविद्यालयातील एम.सी.व्ही.सी.(व्यवसाय शिक्षण ) विभागाचे प्रमुख प्रा. मनोहर बेद्रे आज दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री  व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी प्रा. मनोहर बेद्रे व त्यांच्या कुटुंबाचा यथोचित सन्मान केला तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीस व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' विद्यार्थी घडवण्याचे कार्य तसेच संस्थेचे ध्येय धोरणे नव्या पिढीसमोर मांडण्याचे कार्य प्रा. मनोहर बेद्रे यांनी प्रामाणिकपणे पार पाडले आहे.
  यावेळी प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले.       
   प्रा. मनोहर बेद्रे यांनी संस्थेविषयी ऋण व्यक्त करीत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे यावेळी आभार मानले.     
   संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी, संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे तसेच राजेंद्र जगताप, सदाशिव बेद्रे, सुनिता बेद्रे ,प्रियंका बेद्रे यावेळी उपस्थित होते.    
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहिल बेद्रे यांनी केले.
 सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.
  उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी आभार मानले.
close