shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न .

राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न .

इंदापूर प्रतिनिधी: राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले .सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी इंदापूर न्यायालयाच्या न्यायाधीश मा. सौ. स्वानंदी वडगावकर मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष  अॅड. श्री. नरेंद्र शहा उपस्थित होते.

 सदर शिबिरामध्ये विद्यालयामधील किशोरवयीन मुला-मुली मधील समस्येवरती मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये इंदापूर तालुका वकील संघटनेचे सचिव अॅड. . आसिफ बागवान यांनी पोस्को  कायद्याबद्दल माहिती दिली तसेच इंदापूर तालुका वकील संघटनेचे ज्येष्ठ संचालक अॅड.  मनोहर चौधरी यांनी बेटी बचाओ बेटी पढावो याबद्दल मार्गदर्शन केले .

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. नरेंद्र शहा यांनीही मोलाचे मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा  सौ. स्वानंदी वडगावकर यांनी मुलींच्या स्वसंरक्षणासाठी तसेच आत्मसंरक्षणासाठी अन्यायाला विरोध कसा करावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले .

 ज्याचा उपयोग भविष्यामध्ये मुलींना नक्कीच होईल. या कार्यक्रमास इंदापूर न्यायालयाच्या न्यायाधीश सौ. शितल साळुंखे मॅडम तसेच सौ. ज्योती खटावकर मॅडम त्याचबरोबर इंदापूर तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष  अॅड.  धैर्यशील नलवडे, उपाध्यक्ष अॅड.  अनिल पारेकर, विद्या प्रबोधिनीचे नवनाथ शिंदे सर, राधिका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  दत्तात्रय दडस सर,  नानासाहेब लंबाते सर,  शरद झोळ सर,  अशोक कुलकर्णी सर,  नानासाहेब देवकर सर, सौ. शकीला सय्यद मॅडम,  विनय थोरात सर, सुनीता गलांडे मॅडम, सौ. सविता पांढरे मॅडम,  सचिन जाधव सर,  नितीन भिसे सर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता गलांडे मॅडम यांनी केले. प्रस्ताविक मुख्याध्यापक .दत्तात्रय दडस  सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे मुख्याध्यापक  दत्तात्रय दडस सर यांनी जाहीर केले.
close