इंदापूरमध्ये मोहरम उत्साहात साजरा,आमदार दत्तात्रय भरणे ताबुत मिरवणुकीत झाले सहभागी.
इंदापूर प्रतिनिधी:मुस्लिम बांधवांनी ताबुताची भव्य मिरवणुक काढून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपत इंदापरमध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या ताबुत मिरवणुकीत सर्वधर्मीय बांधवांनी सहभागी होत ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश यानिमित्ताने दिला.तसेच मोहरम सणानिमित्त माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवर्जून उपस्थित राहत सर्वधर्मीयांना मोहरम सणाच्या शुभेच्छा देत ताबुत मिरवणुकीत सहभागी झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अहमदरजा सय्यद,राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष वसिम बागवान,बापू वाघमोडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,जगामध्ये खऱ्या अर्थाने मानवता हाच एक धर्म असुन आपल्या सर्वांना सर्वधर्म समभावाचे संस्कार आहेत.त्यामुळे समाज्यामध्ये तुम्ही-आम्ही सर्वजण अतिशय गुणा गोविंदाने एकत्र राहत आहोत.तसेच एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन बंधुभाव जोपासात असून आप-आपसातील स्नेह आणि आपुलकी कायमस्वरूपी टिकली पाहिजे,यासाठी सर्वधर्मीयांनी असंच प्रत्येकाच्या सणावारांमध्ये सहभागी झाले पाहिजे,अशा शुभेच्छा श्री.भरणे यांनी दिल्या.

