लासुर्णे येथील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
- हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
| फोटो :- इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत लासुर्णे येथील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. |
इंदापूर : प्रतिनिधी दि.30/7/23
लासुर्णे येथील मुस्लिम समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये इंदापूर येथे रविवारी (दि.30) जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या सर्व मुस्लिम कार्यकर्त्यांचा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सत्कार केला.
लासुर्णे येथील जुलैखान मुलाणी (ट्रस्टी चांद तारा मस्जिद, लासुर्णे), वलेखान मुलाणी, अकबर शेख, जावेद मुलाणी, बशीरभाई शेख व त्यांच्या अनेक मुस्लिम सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्या या सर्व मुस्लिम बांधवांना भाजपमध्ये सन्मानाची वागणूक दिली जाईल, सबका साथ सबका विकास हा भाजपचा नारा असल्याचे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी जेष्ठ भाजप कार्यकर्ते लतीफभाई मुलाणी, भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, कमाल जमादार, सलीमभाई मुलाणी, दादाभाई मुलाणी, अँड. मुलाणी वकील, सलीम सय्यद, मुसा पठाण, अस्लम मुलाणी, समीर मुलाणी, मुनीर आतार तसेच बाबा महाराज खारतोडे व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

