shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईभक्ताची बॅग घेऊन पसार झालेल्या आरोपीस शिर्डी पोलिसांकडुन अटक


राजेंद्र बनकर -शिर्डी
रिक्षातुन जाताना अज्ञात व्यक्ती ने लँपटॉप , क्रेडिट कार्ड , बिले इत्यादी वस्तू ठेवलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी संजय भानुदास जाधव रा.गुलमोहर ता.मीरज यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला होता.

सदर गुन्हा दाखल होताच शिर्डी पो.स्टेशनचे पो.निरिक्षक नंदकुमार दुधाळ , पो.ना.जाधव , पो.ना.गडाख , पो.ना.बिरदवडे , असे फिर्यादीसह घटनास्थळी जाऊन आजुबाजुस असलेले सीसीटीव्ही कँमेरे तपासले असता हॉटेल अशोका येथे एक संशयीत रिक्षा दिसून आल्याने सदर रिक्षाचे क्रमांकावरुन आरटीओ विभागाकडुन माहिती घेऊन रिक्षा मालक महादेव बाबुराव कराड रा. मातोश्रीनगर शिर्डी ता.राहाता याचे घरी जाऊन शोध घेतला असता सदर आरोपी कडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या वस्तू मिळून आल्याने आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास दि. २८/७/२०२३ रोजी गुन्ह्यात अटक केली असुन पुढील तपास पो.ना.गजानन गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके आदींच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस नाईक गायकवाड ,पो.ना. गडाख , पो.ना.बिरदवडे यांनी केले आहे.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close