ज्योतसे ज्योत जलाते चलो'या स्वरूपाचे वाचन संस्कृतीचे कार्य प्रेरणादायी =प्रा. सतिश भाकरे
श्रीरामपूर प्रतिनिधी:
ज्ञान ही मानवी संस्कृतीच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. गुरुवर्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आमच्यावर विद्यार्थी अवस्थेतच वाचन संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला.त्यांचे हॆ कार्य म्हणजे 'ज्योतसे ज्योत जलाते चलो 'या स्वरूपाचे असल्याचे मत देवळाली प्रवरा येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील मराठीचे प्रा.सतिश भाकरे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान वाचनालयात प्रा.सतिश भाकरे यांचा आदर्श प्राध्यापक आणि स्वाध्याय परिवारातील सेवाभावनिमित्त सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी 'आजची वाचन संस्कृती 'विषयावर ते बोलत होते.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रा.सतिश भाकरे यांच्या कर्मशील,ज्ञानशील,नम्र, अभ्यासू आणि ग्रन्थप्रेमी व्यक्तिमत्वाबद्दल आठवणी सांगून त्यांच्या वाचन आणि स्वाध्याय सेवाकार्याबद्दल सन्मान केला.सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सौ.राजश्री भाकरे यांच्या सेवाकार्याबद्दल सत्कार केला. यावेळी विजयराव कुंभार, निलेश भागवत,सौ. वैष्णवी भागवत यांचा सन्मान करण्यात आला.प्रा.सतिश भाकरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयातील मराठी विभागातील ज्ञानशील, संशोधनकर्मी, सद्गुणी, विद्यार्थीहित जपणाऱे आणि सर्वांना सतत मदत करणाऱ्या गुरुवर्यांच्या आठवणी सांगितल्या.ज्याच्याकडे खरे ज्ञान असते तो सदैव नम्र आणि सेवाशील असतो.अनेक समाजसेवकांनी आपल्या समर्पित जीवनातून आदर्श उभे केले आहेत. समाजसेवकाला जात,धर्म,पंथ,प्रदेश,काळ अशा गोष्टी संकुचित करू शकत नाही, आदर्श समाजसेवकांनी आदर्श पेरले आणि त्यासाठी संत, देशभक्त, समाजसेवक यांच्याबद्दल आदरभाव ठेवला पाहिजे. त्यांनी जे आदर्श दिले, ते पुढे नेले पाहिजे, वाचन संस्कृती प्रतिष्ठान याच जाणिवेने ज्योतसे ज्योत जलाते चलो 'या वृत्तीने कार्य करीत असल्याबद्दल प्रा. भाकरे यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन सौ. आरती उपाध्ये यांनी केले तर गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111

