shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनाथाश्रामातील मुलांना स्वावलंबी करण्यात वर्ल्ड पार्लमेंट पुढाकार घेणार - प्रा. नरसिंहा मूर्ती


श्रीरामपूर - जगभरात अनाथ आश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनाथ मुलांना समाजातील प्रत्येक घटकाने आपुलकीने वागवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए)चे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा.नरसिंहा मूर्ती यांनी व्यक्त केले.

           डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरने श्रीरामपूर तालुक्यातील गोखलेवाडी येथील श्री. साई विठ्ठल अनाथाश्रमातील मुलांना शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर शालोपयोगी वस्तूंचे वाटप प्रा.मूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. अनाथाश्रमातील मुलांना याप्रसंगी डब्ल्यूसीपीए तर्फे मिष्ठान्न भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

           याप्रसंगी प्रा.मूर्ती यांनी  आश्रमातील मुलांसाठी डब्ल्यूसीपीए सातत्याने मदतीचा हात पुढे करेलच,  शिवाय अनाथाश्रमातील मुलांना व आश्रमालाही स्वावलंबी करण्यास डब्ल्यूसीपीए सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
           आचार्य विनोबा भावेंचे कट्टर शिष्य व डब्ल्यूसीपीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. ई.पी. मेनन हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपिठावर महाराष्ट्र अधिस्विकृती समितीचे सदस्य श्री.प्रकाश कुलथे, जेष्ठ व्यंगचित्रकार रवी भागवत, समाजसेविका संगिता जामगे, वरिष्ठ पत्रकार राजेंद्र बोरसे, उद्योजक मनजितसिंग बतरा, डब्ल्यूसीपीएचे खजिनदार श्री. चिंतामन भोसले, को- ऑर्डीनेटर मेजर अशोक मोहिते, सहसचिव ऋषिकेश विघावे व डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे आदी. उपस्थित होते.
            याप्रसंगी आभार प्रदर्शन करताना श्री.साई विठ्ठल अनाथाश्रमाचे संचालक ज्ञानेश्वर महाराजांनी डब्ल्यूसीपीएच्या कार्याचे कौतुक करताना डब्ल्यूसीपीए आश्रमाला कायम व नियमितपणे मदत करत असल्याचे सांगितले.
close