(दि. ३० जुलै) जुनी सांगवी दापोडीत रस्त्याची दुरावस्था झाल्याने 'प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे' म्हणत मनसेच्या वतीने पाणी साठलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. काही दिवसापासून सतत पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन दिवस झाले सतत तक्रारी आल्यानंतर पुन्हा मनसेच्या पदाधिकान्यानी पाहणी केली आणि अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसून आल्याने है आंदोलन करण्यात आले.
त्यातील सांगवीतील काही रस्त्याचे चंद्रमणी नगर, मधुबन सोसायटी, संगम नगर, ममता नगर, बुध्दघोष सोसायटी, PMPL मुख्य बस स्टॉप, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, शितोळे नगर तसेच दापोडी भागातही दुरावस्था झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्वरीत स्थापत्य विभागाला तक्रार केल्या, पण काही उपाययोजना नाही. असे यावेळी राजू दत्तू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.
या सर्व भागातील दुरूस्ती होत नसल्याने स्थापत्य विभागाच्या विरोधात आज सांगवीत झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे अलेक्सझांडर आप्पा मोझेस उप विभाग अध्यक्ष,
मंगेश भालेकर उपविभाग अध्यक्ष, गणेश माने शाखा अध्यक्ष, मनोज महाजन,
सागर भोकरे वॉर्ड अध्यक्ष, दिलीप ठोंबरे मनसे सैनिक इत्यादी नागरिकही उपस्थित होते.
दुरूस्ती वेळेत न झाल्यास "ह" प्रभाग कार्यालय येथे लवकरच मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही उप शहर अध्यक्ष राजू सावळे व अलेक्स आप्पा यांनी दिला आहे.

