कालठण नं. १ जगतापवस्ती येथे ४३. ४७ लक्ष निधीच्या गेटेड साठवण बंधारा कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न.
कालठण नंबर १ च्या ग्रामस्थांनी विविध विकास कामांच्या मागणीसाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी.
इंदापूर प्रतिनिधी: मृदा व जलसंधारण विभागामार्फत कालठण नंबर १ गेटेड साठवण बंधारा जगताप वस्ती येथे ४३. ४७ लक्ष निधीच्या कामाचे भूमिपूजन समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आयोजित केला होता परंतु त्यांच्या सूचनेनुसार कालठण गावच्या ग्रामस्थ व युवक नेते दीपक जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न( दि. २३ जुलै ) झाला.
यावेळी युवक नेते दीपक जाधव कालटन गावचे माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सरपंच लालासाहेब जगताप, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य भास्कर आबा पाडुळे, माजी सरपंच रवींद्र कदम, माजी उपसरपंच देविदास पाटील, संजीवन पाडुळे, आण्णासाहेब धोत्रे मा.पुणे जिल्हा अध्यक्ष व्हीजे एन टी सेल, हनुमंत पाटील, ब्रह्मदेव सपकळ, इब्राहिम शेख ,शशिकांत गटकुळ ,राहुल शिंदे, संजय शिंदे, वैभव गटकुळ, पापा शेख, बाळासाहेब माणिक जगताप ,शफिक शेख, सुरेश भगत,शाहरुख शेख, महेश भगत, मंगेश जगताप, गणेश जेडगे,तानाजी जगताप, अक्षय जगताप इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------------------
चौकट:
कालठण नंबर १ च्या ग्रामस्थांनी विविध विकास कामांच्या मागणीसाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी.
कालटण गावच्या ग्रामस्थांच्या वतीने युवक नेते दीपक जाधव यांच्या मार्फत आमदार दत्तात्रेय भरणे यांना १).जगताप वस्ती ते शेख वस्ती रस्ता,२). कालटन रस्ता ते जगताप वस्ती (कांबळे वस्ती )रस्ता, ३).करेवाडी रस्ता ते जाधव वस्ती ते भिसे वस्ती रस्ता व दोन पानंद रस्ते कालठण नंबर १ या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या विकास कामांच्यासाठी निधी मंजूर करण्यात यावे अशा विनंतीचे निवेदन देण्यात आले.

