अकोले:- अकोले तालुक्यातील जुन्या पिढीतील वारकरी व्यक्तिमत्व माधव भिकाजी वाकचौरे यांचे नुकतच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९५ वर्ष होते. ते अप्पा नावाने परिचित होते. ते कळसेश्वर भजनी मंडळाचे वारकरी सदस्य होते.
त्यांचे मागे भाऊ, पत्नी, दोन मुले, सहा मुली, पुतणे, सुना नातवंडे, असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अ.नगर जिल्हा बँक कर्मचारी पतसंस्थेचे संचालक भारत वाकचौरे, आढळा विद्यालय, देवठाण चे लिपिक बाजीराव वाकचौरे, प्रकाश वाकचौरे यांचे चुलते, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाकचौरे, विवेकांनद विद्यालय, विरगावचे शिक्षक शरद वाकचौरे यांचे वडील, अमृतसागर दूध संघाचे संचालक गोरख मालुंजकर, माजी शिक्षण उपसंचालक सुरेश आवारी यांचे सासरे तर वकील भूषण आवारी, कळसेश्वर क्लोथ स्टोअर्स चे संचालक सुमित वाकचौरे यांचे आजोबा होते.
कळस येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

