shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कॉम्पुटरवर कमांड त्याला जगभर डिमांड -प्रशांतदादा काटे .

कॉम्पुटरवर कमांड त्याला जगभर डिमांड -प्रशांतदादा काटे .
 इंदापूर प्रतिनिधी:श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे क्रीडांगण व  संगणक कक्षाचे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री आनंद भोईटे साहेब उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते संगणक कक्ष व क्रिडांगणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस तीव्र स्पर्धा वाढते आहे. अशा या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना दुसऱ्याशी स्पर्धा न करता स्वतःच  ती स्वतःशीच केल्याशिवाय जीवनामध्ये यश मिळणार नाही. त्यासाठी झापटून अभ्यास करा व उज्ज्वल यश संपादित करा.असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे  व  श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रशांत दादा काटे  होते. अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना ते असे म्हणाले, भवानीनगर सणसर पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या मुलांना पदवीपर्यंतचे शिक्षण मिळावे. या उदात्त हेतूने श्री छत्रपती महाविद्यालय उत्तमपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तळागाळातील वंचित उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना जगाशी स्पर्धा करायची असेल तर त्याला कॉम्पुटर येणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या जागतिकिकरणाच्या युगात कॉम्प्युटर कमांड त्यालाच जगभर डिमांड असलेलं पाहवयास मिळते आहे. त्यामुळे आज महाविद्यालयाने जे संगणक कक्षाचे उदघाटन केले आहे. त्याबद्दल प्राचार्य व त्यांच्या सर्व टीमचे मनापासून स्वागत करतो. असे प्रतिपादन प्रशांत दादा काटे यांनी केले.
     सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी सांगितले कि, ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत राबवले  जाणारे सर्वच उपक्रम  राबवण्यावरती भर दिला जाईल.आलेल्या सर्वच मान्यवरांनी महाविद्यालयाच्या उत्कर्षासाठी आर्थिक सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी या प्रसंगी केले.
     या कार्यकमासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अँड. रणजितभैया निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, गोपीचंद शिंदे, निवृत्ती सोनवणे,कामगार नेते युवराज रणवरे,दै. प्रभातचे पत्रकार गोकुळ टांकसाळे,राजाभाऊ जाधव,छत्रपती विद्यालयाचे प्राचार्य रमेश मचाले सर, सर्जे सर, गिरीगोसावी सर, कारखान्याचे अधिकारी राजकुमार दराडे, कारखान्याचे कर्मचारी, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री सुशील निंबाळकर,सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्यासंख्येने विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले.तर आभार प्रा. योगिता तरंगे यांनी केले.
close