shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हालगीच्या कडकडात पालकांचे वतीने लाडक्या गुरूजींचा वाढदिवस साजरा.


*हालगीच्या कडकडात पालकांचे वतीने लाडक्या गुरूजींचा वाढदिवस साजरा.

*प्रसिद्धी पासून दूर असलेले व आपल्या कामामुळे लोकप्रिय झालेले अजिनाथ आदलिंग गुरूजी वाढदिवसाच्या निमित्ताने पालकांची अनोखी भेट.*
इंदापूर प्रतिनिधी: दि 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगळवाडी येथे 2018 पासून कार्यरत असणारे , आपल्या शिक्षकीपेशासी एकनिष्ठ राहून गुणवंत मुले घडवण्याचे प्रामाणिकपणे काम करणारे , प्रसिद्धी पासून दूर असणारे मुले , *अवघ्या पाच वर्षात पालक , जेष्ठ नागरिक यांच्या हृदयात जागा निर्माण केलेले आदर्श , होतकरू , कामसू शिक्षक अजिनाथ आदलिंग* यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप करण्यात आले. खामगळवाडी युवक , व्यावसायिक पै मोतीराम खामगळ व सहकारी एकत्र येते गुरूजींना आश्चर्याचा धक्का दिला. हालगीच्या कडकडात , मानाचा फेटा बांधून केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालकांचे प्रेम पाहून गुरूजी भारावून गेले. आपण जर निष्ठा , प्रामाणिकपणा , चिकाटीने , सर्वसमावेशक काम केल्यानेच नपालक , युवक हा सन्मान केल्याची करत असलेल्या कामाचे चीज झाल्याची भावना गुरूजी व्यक्त केली.
एकीकडे शिक्षकांचे तक्रारींचा पाऊस पंचायत समिती येथे असताना ही बाब सर्वाना सुखावणारी आहे. म्हणून लिहिण्याचा प्रपंच... शब्दांकन - श्री संतोष हेगडे निमगाव केतकी.





close