*स्वतःवरील आत्मविश्वास , जिद्द , सातत्य व चिकाटीने निश्चित यश मिळतेच - शिवव्याख्याते आर डी पांडव.*
एजू दुनिया कोचिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: दि १ एजु दुनिया कोचिंग इन्स्टिट्यूट तरंगवाडी येथे सैनिक स्कूल , नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा , पाचवी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत मूलांचा सेवानिवृत्ती प्राचार्य तथा शिवव्याख्याते आर डी पांडव व इन्स्टिट्यूटचे प्रमुख वैभव हेगडे यांचे हस्ते फेटा , गुलाब पुष्प , पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पांडव सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनातील विविध प्रसंग सांगून मुले , पालक व शिक्षक यांचा आत्मविश्वास वाढवला. यावेळी सैनिक प्रवेश मिळाल्याबद्दल राजरत्न मखरे , श्रेयश झगडे , नवोदय विद्यालय प्रवेश मिळाल्या बद्दल अनुराग भोंग , राजरत्न मखरे , सोहम बुलबुले , स्वराली भोंग , राजदीप कांबळे व मंथन , एन एस एस ई , टॅलेंट सर्च मध्ये क्रमांक मिळवलेल्या अलोक भोंग स्वरा हेगडे , श्रेयश भोंग , श्रेया पाटील , समिक्षा मिंड , श्रेयश हेगडे यांचा सत्कार करण्यात आला. *कार्यक्रमाचे प्रस्तावित वैभव हेगडे यांनी केले.* यावेळी पालकांचे वतीने सर्व शिक्षक स्टाफचा सत्कार करण्यात आला. पालकांमधून संतोष हेगडे , डॉ तेजस भोंग यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मुले , पालक सर्व शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन विशाल गाढवे व अनिकेत हेगडे यांनी केले. आभार शिक्षिका मनिषा शिंदे यांनी मानले.

