आधार सेवा परिवाराच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: शनिवार दि. 1 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 5 इंदापूर ( जि पुणे) मध्ये आधार सेवा परिवाराच्या वतीने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आधार आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष श्री अरुण राऊत सर माजी नगरसेवक गोरख शिंदे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल अण्णा पवार (अध्यक्ष- आमचे मेंबर मित्र परिवार, इंदापुर) सामाजिक कार्यकर्ते श्री सागर गानबोटे श्री संतोष काळे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सायराबी शेख सहशिक्षिका सौ रत्ना काळे, सौ. मंगल इथापे, सौ. सुलताना मोमीन या सर्वांच्या हस्ते 102 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आज वाटप करण्यात आले. येत्या आठ दिवसांमध्ये आणखी शंभर ते दीडशे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाणार आहे.
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बारामतीच्या एलआयसी ऑफिस मधील निवृत्त अधिकारी सौ मानसी संजय कुलकर्णी (मॅडम ) , आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष श्री अरुण लक्ष्मण राऊत ( सर ), श्री मंगेश धनाजी जाधव ( इंदापुर ), श्री सचिन कोडगार ( सर ), श्री सोमनाथ कुंभार , श्री विपुल वाघमोडे (कालठण नंबर 1) , श्री रणजीत बबन रुपनवर ( बारामती ), श्री निलेश जालिंदर घोडेकर (पुणे), श्री विजय रामचंद्र राऊत( टेंभुर्णी ), श्री गणेश आदलिंग (गोतन्डी) , श्री स्वप्निल शिंदे , सौ नीलिमा आनंद कुलकर्णी या सर्वांनी आर्थिक मदत केली.

