प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आ नमिताताई मुंदडा यांच्या सहकार्याने बुधवारी वसुंधरा प्रतिष्ठण च्या वतीने केज तालुक्यातील 400 शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
केज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदरील भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून आणि भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार व बाजार समीतीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांच्या नियोजनात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला केज शहरातील 35 शाळांच्या 400 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी युवा नेते ऋषिकेश आडसकर सभापती अंकुशराव इंगळे , नगराध्यक्षा सिताताई बनसोड,पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार , सहाय्यक गटविकास अधिकारी सविता शेप ,एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी शोभा लटपटे ,मुख्यध्यपिका जयश्री गदळे , जेष्ठ नेते सुनीलआबा गलांडे ,वसंत भाऊ केदार, सुदाम पाटील,महादेव सूर्यवंशी भाजपा उपाध्यक्ष अनुरथ शिंदे,व्यापारी महासंघाचे विकास अप्पा मिरगणे, मन्मथ पाटील,डॉ ढाकणे,मुरलीधर ढाकणे,डॉ धनराज पवार,महादेव जाधवर,वीरेंद्र जोगदंड,लक्ष्मण राख, खदीर कुरेशी,नांदे सर,माजी सभापती उबाळे,शिवराम घुले,श्रीकृष्ण लांब, चेअरमन अरुण काळे ,दगडू दळवे, डि.के गायकवाड , मीडिया प्रमुख चंदू मिसाळ,ईश्वर बिक्कड,प्रकाश मुंडे,धनराज लाटे,भैरव सोळंके, लिंबराज फरके, प्रा आघाव , सह माजी सभापती स्वामी,तालुक्यातील सरपंच ,चेअरमन, व भाजपचे पदाधिकारी ,विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती डॉ .वासुदेव नेहरकर यांनी केले. विविध सामाजिक उपक्रम घेऊन ,ताईसाहेब यांच्या कर्तुत्वाला शोभेल आशा पध्दतीने आम्ही गेली 10 वर्ष लोकनेत्या पंकजाताई यांचा वाढदिवस साजरा करतोत असे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. ताई मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात, जलसंधारण, ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाडी बांधकाम ,पाणी पुरवठा, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या अंगणवाडी मदतनीस व कार्यकर्ती भरती प्रक्रिया अशी अनेक सार्वजनिक कामे पारदर्शक पणाने केली आसा उल्लेख त्यांनी केला .युवा नेते ऋषिकेश आडसकर व नगराध्यक्षा सीताताई बन्सोड यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून ताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी केले.
केज तालुक्यातील मस्साजोग,पिसेगाव,होळ, हदगाव अशा अनेक ठिकाणीही शालेय साहित्य वाटप,वृक्षारोपण, विजय स्पोर्ट्स अकॅडमी केज यांना आर्थिक मदत करून क्रीडा क्षेत्रात काम करणारे विनोद गुंड यांचा सन्मान करण्यात आला अशा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

