वडार समाजाच्या जातीच्या दाखल्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडल्याबद्दल दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांचे तमाम वडार समाज बांधव व वडार पॅंथर संघटनेच्या वतीने जाहीर आभार.
वडार पॅंथर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पवार व विधी तज्ञ आत्माराम चौगुले यांनी फोनवर मानले आमदार सुनील प्रभू यांचे आभार.
इंदापूर प्रतिनिधी:वडार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी शासनाच्या असलेल्या अटी व शर्ती शिथील करण्याबाबत लक्षवेधी सूचना दिनांक २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात मांडल्याबद्दल दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांचे तमाम वडार समाज बांधव व वडार पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद इरकल यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पवार, विधीतज्ञ आत्माराम चौगुले यांनी फोनवरून मनःपूर्वक जाहीर आभार मानले . आमदार सुनील प्रभू यांनी त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या श्वसन दिले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या शिंदे फडणवीस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन पै. मारुती चव्हाण आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजाला उभारी मिळवून देण्याचा फार मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या धर्तीवर शासनाने पक्ष भेद विसरून आमदार सुनील प्रभू यांचे सदर लक्षवेधीची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत शासनातर्फे निर्णय करण्यात यावेत अशी मागणी तसेच वडार समाजाच्या हृदयातील राजा माणूस आमदार अभिमन्यू पवार यांनाही त्याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे
. यावेळी वडार पॅंथर संघटनेचे तालुका अध्यक्ष रोहिदास पवार, मनोज चौगुले, गणेश देवकर ,प्रकाश पवार, विधीतज्ञ आत्माराम चौगुले, कोंडीबा घोडके ,किरण चौगुले, सुरज पवार इत्यादी उपस्थित होते.

