shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तीनशे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप ; विष्णू घुले यांचा स्तुत्य उपक्रम..!!


================ 
प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                    संघर्ष कन्या तथा लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांच्या वतीने तालुक्यातील मस्साजोग येथील विद्यार्थ्यांना शालेयबॅगचे वाटप करण्यात आले. 


       
कार्यक्रमास  सुनील गलांडे , बाजार समितीचे उपसभापती डॉ वसुदेव नेहरकर , भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार ,   सरपंच संतोष देशमुख ,उपसरपंच सोणवणे , संभाजी गायकवाड , अभि घाटुळ, चिंचोली से सह सो चेअरमन काळे ,पिंप्रीचे दिनकर चंदनशिव , अनंत मोकाशे ,काळेगावचे हनुमंत सुरवसे , आरणगावचे सरपंच मधुकर सिरसट, सचिन सिरसट ,चंदु मिसाळ , उमरीचे उपसरपंच सोनु ईश्वर बिक्कड, सावंत ,कोरेगावचे रमेश तांदळे , ग्रा. से .साबळे, शिवराम घुले , संतोष घुले ,जयसिंग घुले, गोवीदं घुले ,दिनकर बारगजे ,केदार  यांची प्रमुख उपस्थिती होती . 
          
ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते अशावेळी त्यांना आपल्या मुलांना सगळेच शालेय साहित्य घेता येत नाही म्हणून आपल्या नेत्रत्वचा जन्मदिवस समाजातील जनसामान्यांना मदत करून साजरा करण्याचा संकल्प युवानेते विष्णू घुले यांनी करत मस्साजोग येथील जिल्हा परिषद  शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांना शालेयबॅग वाटप करत सामाजिक उपक्रमाद्वारे लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी शालेय बॅग मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. 
           
यावेळी शाळेचे सर्व कर्मचारी वृंद व गावातील ग्राम पंचायत सदस्य, जेष्ठ नागरीक, तरुण मित्र मंडळी व पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
close