shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एम .जे .एज्युकेशनल फाउंडेशन संचलित, आधार मंच महिला विकास समितीची स्थापना.

एम .जे .एज्युकेशनल फाउंडेशन संचलित, आधार मंच महिला विकास समितीची स्थापना.

निराधार व अन्यायग्रस्त महिलांना  न्याय देण्यासाठी आधार मंच महिला विकास समितीची स्थापना - मनेश जाधव.

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २१ जुलै २०२३ रोजी एम जे एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आधार मंच महिला विकास समितीची स्थापना करण्यात आली.
समाजातील अतिशय तळागाळातील, निराधार तसेच वेगवेगळ्या कारणाने अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आधार मंच महिला विकास समितीची स्थापना करण्यात आली. 
एम जे एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनेश भीमराव जाधव म्हणाले की, देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होऊन गेली तरीसुद्धा महिलांना अजूनही त्यांच्या स्वातंत्र्य व हक्कासाठी संघर्ष करावा लागतो. त्याच प्रमुख कारण त्यांना अजूनही शिक्षणापासून वंचित ठेवून कमी वयात लग्न केले जातात, आणि यामुळे अशा महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना गुलामगिरीची वागणूक देऊन त्यांचा छळ केला जातो. त्यातूनच आत्महत्या सारख्या  घटना घडत असतात. कारण त्या अन्यायग्रस्त महिलांचे म्हणणे न्याय मिळवून देणाऱ्या व्यवस्थापर्यंत पोहोचत नाही. परंतु असं न होता अशाच अन्यायग्रस्त व निराधार महिलांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शवून एम. जे. एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आधार मंच महिला विकास समितीची स्थापना झाली. आधार मंच महिला विकास समिती हे निराधार व अन्यायग्रस्त महिलांच्या हक्काचे व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ अशा महिलांना न्याय देण्यासाठी सज्ज आहे.

समितीच्या स्थापनेला तालुक्यातील विविध भागातील महिलांचे नेतृत्व करणाऱ्या व सामाजिक कार्याचा अनुभव असणाऱ्या महिलांची उपस्थिती होती.
समिती स्थापन झाल्यानंतर एम .जे. एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आधार मंच महिला विकास समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी  उमाताई रामचंद्र मखरे यांची निवड करण्यात आली. तसेच इंदापूर तालुका कार्यकारणी मध्ये सौ. निर्मला शिवकुमार शिंदे यांची इंदापूर तालुका अध्यक्षपदी, सौ. अश्विनी ज्ञानेश्वर साठे यांची इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी तसेच सौ. अर्चना नागेश थोरात यांची इंदापूर तालुका कार्यकारणीच्या सचिव पदी निवड करण्यात आली.
तसेच सौ सुरेखा नरेंद्र खैरमोडे यांची अकलूज शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच सौ. रूपाली शामसुंदर रणदिवे, सौ. मीना सुरेश मिसाळ, सौ मोहिनी उमेश राऊत, सौ हर्षदा भालेराव, सौ. रोहिणी दादासो दरदरे, मनीषा चंदनशिवे, सौ हंसा परमार यांची इंदापूर तालुका कार्यकारणीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.
close