प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २३ / तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत व इतर गावामध्ये रोजगारासाठी बाहेर राज्यातून आलेल्या परप्रांतीय कामगारांचे नोंदी रजिस्टर तयार करण्यात यावे असे निवेदन
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने दि.१७-७-२३ रोजी मा.गटविकास अधिकारी श्री.श्रीकांत खरात यांच्या बरोबर चर्चा करुन निवेदन देण्यात आले होते.
सदर निवेदनास सकारात्मक प्रतिसार मिळाला असून गटविकास अधिकाऱ्यांनी संघटनेच्या निवेदनावर तातडीने दखल घेत नगर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांना सुचना दिल्या .
ग्रामपंचायत हद्दीत व इतर गावामध्ये रोजगारासाठी बाहेर राज्यातून येणाऱ्या परप्रांतीय नागरीकांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून ते आपल्या कुटुंबासह गावात भाडेतत्त्वावर राहत आहे.
परप्रांतीय नागरिकांचे नोंदी रजिस्टर तयार करून सदरचे रजिस्टर ग्रामपंचायत स्तरावर जतन करून ठेवावे असे सांगण्यात आले आहे .

