विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वतःशी स्पर्धा करावी अप्पर - पोलीस अधीक्षक आनंद भोईटे
इंदापूर प्रतिनिधी: श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे क्रीडांगण व संगणक कक्षाचे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भय्यान स्पर्धा आहे. या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना दुसऱ्याशी स्पर्धा न करता स्वतःच स्वतःशी स्पर्धा करून आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे. जीवनामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून कोणत्याही गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. असे विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रशांत दादा काटे होते. अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना ते असे म्हणाले, ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या पदवीपर्यंतचे शिक्षण शिक्षण मिळावे. या उद्देशाने भावनेने महाविद्यालय ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाने प्रकारचे उपक्रम राबवलेत. सुयोग्य वापर करणे गरजेचे आहे. आजचे युग हे ज्ञान विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे त्यामुळे संगणका शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्याय नाही. त्यासाठी संगणक साक्षरता ही काळाची गरज आहे.त्याकरिता संगणक येणे खूप गरजेचे आहे असे. प्रतिपादन प्रशांत दादा काटे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी सांगितले कि, ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत राबवले जाणारे सर्वच उपक्रम राबवण्यावरती भर दिला जाईल.
या कार्यकमा प्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अँड. रणजितभैया निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, गोपीचंद शिंदे, निवृत्ती सोनवणे,कामगार नेते युवराज रणवरे,दै. प्रभातचे पत्रकार गोकुळ टांकसाळे,राजाभाऊ जाधव,छत्रपती विद्यालयाचे प्राचार्य रमेश मचाले सर, सर्जे सर, गिरीगोसावी सर, कारखान्याचे अधिकारी राजकुमार दराडे, कारखान्याचे कर्मचारी, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री सुशील निंबाळकर,सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्यासंख्येने विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले.तर आभार प्रा. योगिता तरंगे यांनी केले.

