ढुकेवस्ती शाळेतील मुलांचे नॅशनल प्रोॲक्टीव अबॅकस स्पर्धेत यश
इंदापूर प्रतिनिधी: दि.२२ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ढुकेवस्ती,ता.इंदापूर,जि.पुणे येथे शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थ ढुकेवस्ती यांच्या तर्फे दि.२५ जून २०२३ रोजी संभाजीनगर येथे झालेल्या "नॅशनल प्रोॲक्टीव अबॅकस" स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार समारंभ आयोजित केला होता. ही स्पर्धा "स्टार जिनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर, बार्शी"* यांच्यामार्फत घेण्यात आली होती. या सेंटरच्या संचालिका व मार्गदर्शक शिक्षिका सौ. जयश्री चाटे मॅडम यांनी ऑनलाइन क्लासद्वारे मुलांना मार्गदर्शन केले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढुकेवस्ती येथील पाच विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता..
1) सुयश सुनील धुरुपे 100 पैकी 98 गुण (तृतीय)
2) सार्थक भाऊराव रोकडे 100 पैकी 95 गुण ( तृतीय)
3) श्रीवर्धन महेश ढुके 100 पैकी 94 गुण (चतुर्थ)
4)सार्थक श्रीपाद ढुके आणि 5)योगीराज सागर काळे यांनी Finalist म्हणून यश मिळवले....
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना हार, फेटा व शालेय वस्तू भेट देऊन यथोचित असा सन्मान केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सतीश ढुके, उपाध्यक्ष श्री. महेश ढुके, शिक्षणतज्ञ श्री. विजय ढुके, अगोती 2 चे सरपंच श्री. चांगदेव ढुके, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर चे संचालक श्री. मनोहर ढुके, माजी सरपंच श्री.उत्तम ढुके, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री.परबत ढुके, व विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री. हनुमंत ढुके, सन्माननीय ग्रामस्थ श्री. दिगंबर ढुके, श्री.उत्तम काळे, श्री.उत्तम ढुके, श्री. सागर काळे, श्री.नरहरी काळे, श्री. श्रीपाद ढुके, श्री. दत्तात्रय ढुके, श्री. श्रीरंग ढुके, श्री. उद्धव ढुके, गोरख ढुके तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते..

