shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा. सुजय विखे चे लोकसभेतील काम जिल्ह्यासाठी कौतुकास्पद



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

 शिर्डी लोकसभेत सर्वाधिक वेळा चर्चेत सहभागी होवून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणा-या पहील्या १० खासदारांच्या यादीत अहमदनगरचे  खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा क्रमांक असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले . जिल्ह्याच्या दृष्टीने ही कौतुकास्पद बाब असल्याचे  शिर्डीचे प्रथम  नगराध्यक्ष कैलासबापू कोते पाटील यानी सांगीतले .


लोकसभेच्या सभापतीनी नुकतेच लोकसभेतील सर्वाधिक चांगली कामगीरी करणा-या पहील्या दहा खासदारांची नावें जाहीर केली त्यात नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा समावेश असल्याबद्दल प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, कमलाकर कोते,,अभय शेळके ,राजेंद्र शिंदे ,नितिन कोते,दादा गोंदकर,उत्तम कोते,राजेंद्र कोते,दत्ता कोते,हाजी बिलाल शेख ,रवी गोंदकर,दीपक वारूळे ,प्रमोद गोंदकर,जगन्नाथ गोंदकर आप्पासाहेब कोते, विनायक कोते,नंदू कोते,अरविंद कोते,गणपत गोंदकर, भाऊ भोसले दत्तात्रय गोदकर अजय नागरे नाना काटकर,खंडू गोर्डे गफ्फार पठाण, नितीन धिवर, सचिन गायकवाड प्रसाद सुरांजे, वैभव सोणवणे 

 शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थ आणी पदाधिका-यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला . 


यावेळी बोलताना कैलासबापू कोते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी गृहमंत्री अमित शाह ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस  ,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वाखाली खा. सुजय विखे पाटील यानी नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला . जनतेचे प्रश्न संसदेत मांडून सोडवनुक केली आहे . नगर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सर्वाधीक योजनांची अमलबजावनी करून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे .जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली . शिर्डीतील अंतराष्ट्रीय विमानतळावर नाइट लँडीगची सुविधा निर्माण करण्यात मोठें योगदान दिल्याने जिल्ह्यातील विकासाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे . शिर्डीकरांसाठी व जिल्ह्याच्या विकासात खा. सुजय विखे पाटील महत्वाची भूमिका केंद्रात बजावत शेतकरी,पाणी ,सहकार,ग्रामीण समस्या ,शेतमजुर व युवकांचे प्रश्न संसदेत मांडले असुन त्यांनी सेसदेत केलेल्या कामाची पावती या निमित्ताने मिळाली असल्याचे कैलास कोते यांनी सांगीतले .
close