shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील निर्लेखित,जीर्ण झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पंधरा दिवसाच्या आत पाडाव्यात,आणि मुलांना पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.


पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जन आधार संघटनेचा ठिय्या आंदोलन. 

                                   
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच जामगाव (पाथर्डी रोड, तालुका - नगर ) येथील जिल्हा परिषद शाळा वर्ग खोलीची भिंत आणि छत कोसळले परंतु सुदैवाने त्या दिवशी रविवार आणि रात्र असल्याने कुठल्याही प्रकारची जीवित हानी घडली नाही. मागील सहा वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट 2017 रोजी निंबोडी येथील शाळा इमारत कोसळून त्यामध्ये तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला तर पाच मुलं गंभीर जखमी झाली होती. त्या घटनेनंतर नगर तालुक्यासह जिल्ह्यातील अशा अनेक जीर्ण खराब झालेल्या शाळा वर्ग खोल्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी म्हणजे मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील शेकडो वर्ग खोल्या या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तसेच शिकवण्यासाठी योग्य नाहीत आणि त्या पडण्याच्या अवस्थेत असून त्यामुळे अशा अनेक वर्ग खोल्यांचे निरलेखन करून त्या पाडण्यात याव्यात,असा शासनाने आदेश देखील दिला होता. परंतु जिल्हा परिषद अहमदनगर प्रशासनाचा तसेच नगर तालुका पंचायत समितीचा हा ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळेच मौजे. जामगाव येथील शाळेची वर्गखोली अगदी थोडया पावसाने पडली. आणखी किती गोरगरीब विद्यार्थ्यांचे बळी गेल्यानंतर आपले हे निर्दयी प्रशासन जागे होईल हे ही कळायला तयार नाही.


 वास्तविक पाहता आज अनेक वर्गखोल्या ह्या केवळ निर्लेखना अभावी किंवा त्यातील ज्या काही जाचक अटी शर्ती आहे त्यामुळे त्या पाडण्यास विलंब होत आहे. आणि निरलेखित शाळा वर्ग खोल्या न पाडल्यामुळे त्या ठिकाणी नवीन खोल्या देता येत नाही. हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या सर्व शाळा वर्ग खोल्यांचे निरलेखन करण्याची जबाबदारी ही शिक्षकांकडे न देता ती बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे द्यावी जेणेकरून ती अधिक गतिमान होईल . कारण आजही तालुक्यातील अनेक वर्ग खोल्या आपल्या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पडण्याच्या तयारीत आहे. तसेच मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेला निर्लेखनाचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसांमध्ये तातडीने नगर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवून या सर्व जीर्ण खराब झालेले वर्ग खोल्या पाडण्यात याव्या,आणि मुलांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत दीपक गुगळे, अमित गांधी, सोहेल शेख, गणेश जाधव, किरण गाढवे, संतोष डमाळे आधी सहपदाधिकारी उपस्थित होते. अन्यथा पंधरा दिवसानंतर संघटनेच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे........
close