shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छत्रपती महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी संस्था कायम कट्टीबध राहील -प्रशांत काटे .

श्री छत्रपती महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी संस्था कायम कट्टीबध राहील -प्रशांत काटे .
    इंदापूर प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये होणाऱ्या नॅक मूल्यांकनाच्या कार्याची माहिती व पाहणी करण्यासाठी  श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  प्रशांत  काटे, संस्थेचे सचिव  अशोक मोरे यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.
        सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्रचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले.आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले. प्रचार्यानी प्रस्ताविकामध्ये अवघ्या 45 दिवसात अहोरात्र मेहनत घेऊन नॅकचा सेल्फ स्टडी रिपोर्ट यशस्वीरित्या प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुर्ण  केला. महाविद्यालयाच्या उत्कर्षासाठी कट्टीबद्ध राहून कार्य करू अशी ग्वाही त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
   संस्थेचे सचिव अशोक मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या परिवर्तनमय बदलाचे स्वागत करुन प्राध्यापकांनी नॅकसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दादा काटे होते. अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भवानीनगर सारख्या कारखान्याच्या पंचक्रोशीतील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना पदवीपर्यंतचे शिक्षण गुणवत्ता पूर्ण मिळावे. या उदात्त हेतूने श्री छत्रपती महाविद्यालय उत्तमपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या वर्षी महाविद्यालय नॅक मूल्यांकन करून घेत आहे. महाविद्यालयात जे परिवर्तनमय असा अमूलाग्र बदल होतो आहे. निश्चितपणे आपण प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी  या नॅकच्या कामासाठी झोकून देऊन कार्य करत आहात. हे खऱ्या अर्थाने  कौतुकास्पद आहे. छत्रपती महाविद्यालयाच्या उत्कर्षासाठी संस्था आपल्या पाठीशी ठामपणे कट्टीबद्धपणे उभी राहुन काम करेल. आपल्याकडून अपेक्षा इतकीच राहील या महाविद्यालयाचा शैक्षणिक व गुणात्मक आलेख उंचावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.असे आव्हान त्यांनी प्राध्यापकांना केले. प्राचार्य, उपप्राचार्य व आपण सर्वजण करत असलेल्या कार्याचे मनापासून त्यांनी अभिनंदन यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले तर आभार कार्यलयीन अधीक्षक  सुशील निंबाळकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी राजकुमार दराडे, अभिजित सावंत,नाडगौडा सर तसेच  महाविद्यालययातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
close