*भिडेंवर कायदेशीर कारवाई करुन बेताल वक्तव्याला आळा घाला. - ॲड कृष्णाजी यादव.*
*भिडेंनी राष्ट्रपुरुष यांचे बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ निमगाव केतकी बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन व भिडेंच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध...*
इंदापूर प्रतिनिधी: दि २ राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याने मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांचे निषेधार्थ निमगाव केतकी येथे इंदापूर तालुका माळी परिषद व फुले प्रेमी सर्व सामाजिक संघटना , ग्रामस्थ यांचे वतीने गाव बंद ठेवत , इंदापूर बारामती रोड रास्ता रोको व भिडेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भिडेंवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन पोलीस निरीक्षक इंदापूर यांना देण्यात आले.
यावेळी माळी परिषदेचे अध्यक्ष ॲड कृष्णाजी यादव यांनी प्रशासनाला कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले. *यावेळी अंकुश जाधव , सरपंच प्रविण डोंगरे , राहुल जाधव , अमर बोराटे , अतुल मिसाळ , संतोष राजगुरू , बाबजी भोंग , किरण म्हेत्रे , शशिकांत शेंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.*
यावेळी देवराज जाधव , दत्तात्रय शेंडे , तात्यासाहेब वडापुरे , माऊली बनकर , मोहन दुधाळ , वसंत मोहोळकर , निवृत्ती गायकवाड , मेहेर साहेब , गोरख आदलिंग , भगवान हेगडे , संदिप भोंग ,दादाराम शेंडे , बबन खराडे , ॲड सचिन राऊत , तुषार खराडे , ॲड सुभाष भोंग , ॲड संदीप शेंडे , पांडुरंग हेगडे , सुहास जाधव , राजकुमार राऊत , भारत ननवरे , सोमनाथ आदलिंग , संतोष घनवट , सचिन मुलाणी युवक , विविध संघटना पदाधिकारी , सदस्य , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *आंदोलन यशस्वी करण्यासाठी माणिक भोंग , राजू भोंग , प्रविण डोंगरे , दत्तासाहेब मिसाळ यांनी विशेष सहकार्य केले.* संतोष हेगडे यांनी आभार मानले.

