*बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनोहर भिडे च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन...*
राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या बद्दलचे बदनामीकारक वक्तव्याचा व्यक्त केला निषेध..
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर येथे नगरपरिषदेसमोर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दहन (दि. ०१)करण्यात आले.
अमरावती येथे (दि. २७) जुलै रोजी व्याख्यानातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्या पुतळ्यास जोडे मारून, दहन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
मनोहर भिडे वारंवार बहुजन महापुरुषांबद्दल अपशब्द उच्चारत असतात, खोटा इतिहास सांगून तरुणांची माथी भडकवत असतात. त्यामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये त्याच्या बद्दल रोष वाढला आहे अशा शब्दातील रोष कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतून दिसून आला.
महापुरुषांची बदनामी करणे, अश्लील शिवीगाळ करणे, जाती धर्मात तेढ निर्माण करून देशातील शांतता भंग करणे या आरोपांच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रमुख संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच देशद्रोही भुमिकेमुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी. या मागणीसाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना इंदापूर पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा मा. प्रतिभाताई उबाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव एड. राहुल मखरे, रमेश आबा शिंदे यांनी मनोगतातून रोष व्यक्त केला.
यावेळी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. पोपट शिंदे, बिएमपी चे जिल्हाध्यक्ष मा. बाबासाहेब भोंग, तालुकाध्यक्ष राहुल शिंगाडे, भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष मा. नानासाहेब चव्हाण, भारत मुक्ती मोर्चा चे तालुका अध्यक्ष मा. अमोल मारकड, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे, युवा नेते प्रशांत मामा उंबरे, छत्रपती क्रांती सेनेचे शहराध्यक्ष अभिजीत चव्हाण, दिपक मगर, संजय शिंदे, सुरज धाईजे, वसिम शेख, संतोष क्षीरसागर, शहराध्यक्ष नागेश भोसले, शुभम पवार, हमीद आतार, बाळासाहेब क्षिरसागर, रोहित ढावरे, संतोष कांबळे, गणेश चंदनशिवे, अनिल खराडे, संतोष मिसाळ, भैरवनाथ व्यवहारे, आझाद सय्यद, एड. सुरज मखरे, नितीन देशमाने, दादा आदलिंग, विनोद कांबळे यांच्यासह इतर शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.

