shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"मयूर दौंडकर युवा फाउंडेशनच्या वतीने"१५ऑगस्टस्वातंत्र्य दिनी" श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव येथे देशी १००० वृक्षांचे , वाटप"

खेड:-

*पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन हा उपक्रम फाउंडेशन च्या वतीने हाती घेण्यातआला आहे.

      मंगळवार दि: १५-०८-२०२३ रोजी शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव, ता. खेड जि.पुणे येथे "७७ व्या स्वातंत्र्य दिनाचा" कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला, गावातील ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येनेउपस्थित होते. 
        या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शेल- पिंपळगावातीलच शिवाजी विद्यामंदिर शाळेचा माजी विद्यार्थी मयूर मगन दौंडकर युवा फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण रक्षणाच्या  दृष्टिकोनातून एक हजार वृक्षांचे वाटप करून विद्यार्थी, पालक, यांच्यावर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली.
      मयूर दौंडकर हे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्या पदभार सांभाळत आहेत. आजकाल शहरात शिक्षण घेऊन बरीच लोक तिथेच स्थायिक होतात असे आपल्या निदर्शनास येते, परंतु मयूर दौंडकर हे अनेक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत असून तळागाळात जाऊन, स्वतः गावोगावी फिरून युथ फाउंडेशन च्या माध्यमातून अनेकांच्या मदतीला धावून जातात, अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. देशाचा विकास हा ग्रामीण भागात होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात समाजातील समस्या निवारण करण्याचे सामर्थ्य  युवका मध्ये असून युवकांना संघटन करून विधायक कार्यास लावण्याचा त्यांचा मनोदय आहे.
     भारत हा युवकांचा देश आहे, या युवा पिढीची बुद्धिमत्ता, चातुर्य, धैर्य व चिकाटीला जर योग्य मार्गदर्शन दिले तर भारत हा जगातील सर्वाधिक गुणवत्ता आसलेला देश होईल, असे विचार मयूर यांनी मांडले.

     कार्यक्रमात मयूर दौंडकर युथ फाऊंडेशन तर्फे जमलेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये  देशी प्रजाती असलेलेच वृक्षाचा समावेश करण्यात आला, वृक्ष तोडी मुळे देशी वृक्षांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहे, व या देशी प्रजातीचे संगोपन करण्या साठी मयूर दौंडकर यांनी  देशी वृक्षांच्या रोपांचे वाटप केले.         आजच्या युवा पिढीला आपल्या देशाबद्दल, इतिहासाबद्दल माहिती द्यायलाच हवी परंतु त्याला विज्ञानाची व सामाजिक ज्ञानाची जोड हवी जेणे करून आपली युवा पिढी आपले विचार मांडू शकेल असे मयूर दौंडकर यांनी आपल्या भाषणात मांडले.
       मयूर दौंडकर युवा फाउंडेशन च्या वतीने खेड तालुक्यात यापुढेही वेगवेगळ्या गावांमध्ये"घर तेथे वृक्ष"असा वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
close