श्रीरामपूर प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूरमध्ये कार्यालयात काम करताना सुखदेव सुकळेसर यांच्यासारखे रयतनिष्ठ व्यक्तिमत्वे ही आमची प्रेरणा होती, नेमून दिलेले काम प्रामाणिक भावनेने करण्यातच खरे समाधान असल्याचे मानसिक सुख आम्हीं अनुभवतोय असे मत रयत शिक्षण संस्थेतून अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले सयाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सयाजीराव देशमुख यांच्या आदर्श कार्याचा सत्कार साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी सयाजीराव देशमुख बोलत होते. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी ३० जानेवारी २०१८ पासून केलेल्या कार्याची माहिती देत स्वागत केले. यावेळी संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ.शशिकलाताई देशमुख,समीर देशमुख व परिवार उपस्थित होते.
सयाजीराव देशमुख यांनी आपल्या सन्मानाबद्दल प्रतिष्ठानचे पदाधिकारी,सदस्य यांचे आभार मानत बोरावके कॉलेजमधील अनेक आठवणी सांगितल्या. डॉ.बाबुराव उपाध्ये आपल्या मनोगतात म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही कर्मवीरांच्या आदर्श विचारातून गतिशील आहे, ती देशमुखसर, सुकळेसर अशा अनेकांच्या प्रामाणिक 'कर्मं 'शीलत्यामुळे प्रगतीपथावर आहे. तेच समाधान हेच जीवनसाफल्य आहे. अशा गुणी, प्रामाणिक, माणुसकीसंपन्न सेवकांमुळेच आमच्यासारख्या पोरक्या, अनाथ, निराधारांचे शिक्षण झाले, असे सांगून देशमुख परिवाराचे कौतुक केले.सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
*9561174111

