shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी जि.प.उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडेंच्या वाढदिवसी रूग्णसेवेचा महायज्ञ..!!



महाआरोग्य शिबिरात ५५० गरजु रूग्णांचा सहभाग.!! 

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-

बीड जिल्हा परिषेदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी रामानंदतिर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आंबेजोगाई यांच्या सहकार्याने महाआरोग्य तपासणी शिबिर सोमवार दि-१४-०८-२०२३ रोजी स.९ ते ३ यावेळेत रामकृष्णगड आंबळाचे बरड (सारूळ) येथे आयोजित करण्यात आले होते.

या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ ह.भ.प.त्रिविक्रमानंद शास्त्री ईंदुवासिनिकर व विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.महाआरोग्य शिबरामध्ये ५५० गरजु रूग्णांनी लाभ घेतला आहे.

शिबिरामध्ये कॅन्सर,मूत्रपिंड व मुत्रमार्ग विकार,अस्थिव्यंग,बालरोग,नेत्र शस्त्रक्रिये व मोतिबिंदू,साधेदुखी व फुफूस आजारावर उपचार,ह्रदयरोग,स्त्रिरोग,त्वचारोग,कृत्रिम अवयव,एन्टरव्हेलशनल रेडिओलाॅजी,मेंदु व मज्जासंस्था ईत्यादी आजारावर डाॅ.कार्तिक सर (शल्यचिकित्सा तज्ञ)  डाॅ.संकेत निसाले सर (नेत्र तज्ञ) डाॅ.बुध्दभूषण रंगारी सर (औषध वैद्यक तज्ञ) डाॅ.अतुल कदम (बालरोग तज्ञ) डाॅ.किरण डाबळे सर (स्त्रिरोग व प्रसुती तज्ञ) डाॅ.दत्ता तागडकर सर (हाडांचे विकार तज्ञ) डाॅ गौरव सिंह सर (कान,नाक,घसा तज्ञ) आदि तज्ञ डाॅक्टरांनी विविध आजारावरील रूग्णांवर उपचार केले.

दरम्यान विडा येथिल रेणूका नर्सिंग स्कुलचे विद्यार्थी,विद्यार्थिंनींनी शिबिराला सहकार्य केले.यावेळी गरजु रूग्णांसह परिसराती नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close