shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करा:-राहुल खोडसे..!!



प्रकाश मुंडे  /  बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यात मागील 20 ते 25 दिवसापासून पावसाने खंड पडल्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिलदार यांना गुरुवार, दि. १७ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल खोडसे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन,तुर,मूग,उडीद,कापूस पिके करपत आहेत. मागील महिन्यामध्ये अल्पसा पाऊस झालं अन या महिन्यात तर पावसाचा थेंब देखील पडला नसल्याने सर्व पिकाची वाढ खुंटली असून पाण्याअभावी पिके करपत आहेत. त्याचप्रमाणे पीक करपून गेल्याने शेतकरी तणावात जगत असून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी निवेदनात केली आहे .असे न झाल्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संघटक शशिकांत कन्हेरे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर उपाध्यक्ष विलास गुंठाळ प्रवीण ठोबरे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे उपजिल्हाध्यक्ष राहुल खोडसे,पैठणचे सरपंच रुस्तुम चौधरी, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष संदीप शितोळे, संकेत चव्हाण,अशोक धिंडूळे,शेखर थोरात,गणेश गुजर,शरद खोडसे,सोमनाथ गुजर,मधुकर कदम आदींच्या स्वाक्षरी आहेत.
close