पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जगाला पुण्यमय कार्याची दिशा देणारे - प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे.
इंदापूर प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.संजय मोरे यांनी केले.प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेताना मध्ययुगीन काळात एक स्त्री राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवींनी आदर्शवत राज्यकारभार करून पुण्यमय कार्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांनी राज्यकारभरा बरोबरच युद्ध कौशल्यातील प्रविण्या दाखवून अनेक राज्यकर्त्यांना राजकारण, समाजकारण आणि युद्धकौशल्या बरोबरच पुण्यमय कार्याची दिशा दिली.त्यांचे कार्य हे जगाला दिशा देणारे आहे.प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विविध पैलुंवरती प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. शितल शिंदे यांनी आभार मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी,कार्यालयीन अधीक्षक सुशिल निंबाळकर, गणेश क्षीरसागर हे उपस्थित होते.

