shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित ७ वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा संपन्न.

 कुमार प्रणित कोठारीने सर्व सामने जिंकले           
अहमदनगर / प्रतिनिधी

नगर : १३ /  अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित ०७ वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा नुकतीच नागर महाजनवाडी जुना कापड बाजार येथे संपन्न झाली. याप्रसंगी कुमार प्रणित कोठारी व पंच देवेंद्र ढोकळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी प्रणित कोठारीने सांगितले की बुद्धिबळा मुळे मला अभ्यासात सुद्धा चांगले यश मिळाले. मला एका ठिकाणी बसण्याची सवय झाली.

शंभरच्या वर स्पर्धा प्रणित कोठारी खेळला असून त्याने आपले मनोगत सात वर्षाखालील खेळाडूंना व पालकांना सांगितले.

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित ०७ वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धेचे उद्घाटन कुमार प्रणित कोठारी यांने पटावर चाल देऊन केले. याप्रसंगी प्रणित कोठारी चे आजोबा श्री चंपालाल कोठारी ,वडील श्री नवनीत कोठारी,आई सौ प्रिया कोठारी, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे प्रशिक्षक प्रकाश गुजराथी, पंच रोहित आडकर,  देवेंद्र ढोकळे, आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.          
यावेळी सामने अतिशय रंगदार झाले. ४ फेऱ्यांमध्ये विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामधे ७ वर्षाखालील गटामध्ये प्रथम अन्वित गायकवाड चार गुण, द्वितीय शर्विल भगूरकर तीन गुण, तृतीय चिन्मय गोरे तीन गुण, चतुर्थ सुघोष कंकाळ तीन गुण, पाचवा आरव नागपुरे दोन गुण मिळून विजयी झाले तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक माही तनवर दोन गुण, द्वितीय अन्वी आदिक दोन गुण  हे खेळाडू विजयी झाले.

सर्व विजेत्यांचे अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया उपाध्यक्ष श्री नरेंद्र कुलकर्णी तसेच उपस्थित पालक व खेळाडूंनी केले.

प्रणित कोठारी यांनी सर्व खेळाडूंना पराभूत केले

सतरा वर्ष आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू व १७०० च्या पुढे मानांकन असलेला अहमदनगर जिल्ह्यातील जुनी खेळाडू श्री प्रणित कोठारी या  गुणी बुद्धिबळ खेळाडूने साडेतीन तास खेळत सर्व खेळाडूंवर विजय मिळवला त्याचे सुद्धा अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष श्री नरेंद्र कुलकर्णी व उपस्थित पालक व खेळाडूंनी टाळ्या वाजवून केले.
close