shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुर पोलीसांनी दरोडयाच्या तयारीत असलेली टोळी कडून ३,१४,०००/ किमंती मुददेमाल जप्त ०६ घरफोडीचे गुन्हे केले उघड.

इंदापुर पोलीसांनी दरोडयाच्या तयारीत असलेली टोळी कडून ३,१४,०००/ किमंती मुददेमाल जप्त ०६ घरफोडीचे गुन्हे केले उघड.

पिठेवाडी, भगतवाडी, बावडा, निमगाव केतकी, सरस्वतीनगर, भवानीनगर परीसरा चो-या केल्याचे तपासात निष्पन्न 
इंदापूर प्रतिनिधी: दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी इंदापुर पोलीसांनी दरोडयाच्या तयारीत असलेली टोळी कडून ३,१४,०००/ किमंती मुददेमाल जप्त करून ०६ घरफोडीचे गुन्हे उघड केल्याचे इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रेस नोट द्वारे  माहिती दिली.  सदर अधिक माहिती देण्यात आली आहे की,दि.१९/०८/२०२३ रोजी पहाटे ०३:०० वा चे दरम्यान इंदापुर पोलीस स्टेशन हददीत रात्रगस्त दरम्यान दरोडा घालण्याचे पूर्व तयारीत असलेला टोळीतील इसमांकडे पोलीस कोठडी मध्ये कसून तपास केला असता यातील अटक आरोपी नामे १. दिलीप सयाजी पवार, कटफळ रा. बारामती ता बारामती जि. पुणे २. शामराव उर्फ जगताप काळुराम भोसले व पिटकेश्वर ता. इंदापुर जि. पुणे. ३. खोपेश्वर उर्फ खोप्या शिवा भोसले वय २३ वर्षे पिटकेश्वर ता. इंदापुर जि.पुणे ४. शिवा मिठ्ठु भोसले रा. पिटकेश्वर ता. इंदापुर जि.पुणे (फरार) यानी मिळून मौजे पिठेवाडी, भगतवाडी, बावडा, निमगाव केतकी, सरस्वतीनगर, भवानीनगर परीसरा चो-या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून तपासामध्ये सहा तोळे सोने, ०१ नग एल ई डी टी.व्ही अशा एकूण ३९४००० रूपये च्या किमती मुद्देमाल जप्त करून ०६ घरफोडीचे खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले. १). इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०४६/ २०२२ भा.द.वि. कलम ३८०, ४५७ .२) इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३२ / २०२२ भा.द.वि. कलम ३८०, ४५४ ३ )इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०३ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५४४५७.४). इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६५ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७ ५). इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ८८१ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७ ६). वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६१२ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७

सदर कारवाई ही  अंकित गोयल , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच  आनंद भोईट , अप्पर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग  गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहा पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरिक्षक सुधिर पाडुळे, सहा पोलीस फौजदार के.बी. शिंदे, चालक पी. हवा. सुनिल बालगुडे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, माधुरी लडकत, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनिल कदम, कळसाईत, पोलीस शिपाई विनोद लोखंडे, आरीफ सय्यद, अकबर शेख, विशाल चौधर, सुधिर शेळके दिपेश चोरमले यांनी मिळून केली.
close