प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
नगर: दि. २५ / अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सप्तक सदन, खिस्त गल्ली, अहमदनगर येथे आयोजित केली आहे असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. या स्पर्धेत प्रोत्साहन म्हणून अंदाजे ३० हजार रुपयांचे बक्षीसे देण्यात येणार असून ९ वर्षाखालील गट, १४ वर्षाखालील गट, १९ वर्षाखालील गट, मुलींचा गट व खुला गट इत्यादी गटात पाच रोख बक्षिसे व पाच थ्रीडी करंडक देण्यात येणार आहेत असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
आत्तापर्यंत १२५ खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून रविवार २७ तारखेला सकाळी नऊ वाजता या स्पर्धेची सुरुवात होईल असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. ९,१४,१९ व मुली अशा विविध गटांमध्ये प्रोत्साहन म्हणून १० बक्षीसे असल्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत नाव नोंदणी करावी असे आवाहन सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, शाम कांबळे इत्यादींनी केले आहे.
स्पर्धेचे प्रमुख पंच सागर गांधी असून त्यांना देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर इत्यादी पंच त्यांना सहकार्य करणार आहेत. ज्यांनी अजूनही नाव नोंदणी केली नसेल त्यांनी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा. यशवंत बापट ९३२६०९२५०१, पारुनाथ ढोकळे ९८५०७०४२६८ असे आव्हान नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.

