shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संपत्ती लालसा.. चंद्रकांत शहासने

ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर (९५६दिवसांचे अभियान)
लेखांक क्र.८ दिनांक २३/८/२०२३

संपत्ती लालसा 

सुदृढ आरोग्य हीच शाश्वत संपत्ती असे सर्वजण मान्य करतात. मात्र संपत्ती कमाविताना स्वतःसह संपूर्ण कुटूंबाच्या, समाजाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. 
आपल्या पाल्यांना आरोग्य साक्षरतेचे धडे देण्यास पालक फारसे आग्रही नसतात. त्यामुळे बालपणापासून आरोग्य साक्षरता हा विषय बाजूला पडतो आणि संपत्ती कमाविण्याची अनेक  प्रलोभने मुलांसमोर मांडली जातात. 

केवळ उच्चशिक्षणातून संपत्ती, मानमरातब, ऐश्वर्य, किर्ती प्राप्त करणे व हे करीत असताना सामाजिक बांधिलकी, समाजकल्याण, स्वतःचे आरोग्य, कुटुंब,आचरण, तत्वे, संस्कृती बाजूला सारून केवळ संपत्तीचा पाठलाग करीत संपत्तीचा साठा करणे या दुष्टचक्रात आज समाजव्यवस्थाच आंधळी होताना दिसत आहे. 
या संपत्ती लालसेचा दृष्य परिणाम म्हणजे ऐन उमेदीच्या काळातच आरोग्य धोक्यात येत आहे व संपत्तीचा मोठ हिस्सा औषधोपचारासाठी खर्च होत आहे.

देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे
मो.क्र. ९८८१३७३५८५
close