shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर्मलनगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ...


नगर : १५ /   नगर येथील  सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ निर्मलनगर येथे मा .नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात  साजरा करण्यात आला .

सर्वप्रथम मा .नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले . राष्ट्रध्वजास उपस्थितांकडून मानवंदना देण्यात आली .

अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देश स्वतंत्र केला आहे आणि म्हणूनच आपण आज ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करत असल्याचे वारे यांनी सांगितले .

यावेळी राहूल सांगळे , डॉ . ताजवे , अभिषेक खामकर यांनी देशभक्तीपर भाषण करून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला . तसेच डॉ .ताजवे यांनी शुभेच्छा देऊन देशभक्तीपर भाषण केले . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप  करण्यात आले .

यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला  संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, युवा नेतृत्व राहुल सांगळे , सुशांत भिंगारदिवे, जावेद इनामदार, साजिद इनामदार , सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर  ,वर्षा गवळी आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close