shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वेगवेगळ्या पिकांची लागवड योग्य पद्धतीने नियोजन करून कराव्यात - आप्पासाहेब जगदाळे.

शेतकऱ्यांनी शेतीमध्ये एकाच पिकाची लागवड न करता वेगवेगळ्या पिकांची लागवड योग्य पद्धतीने नियोजन करून   कराव्यात - आप्पासाहेब जगदाळे.

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व राष्ट्रवादीची पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते केला दहा टक्के लाभांश वाटपाचा शुभारंभ.
इंदापूर प्रतिनिधी: शेतकऱ्यांनी शेतीमध्ये एकाच पिकाची लागवड न करता वेगवेगळ्या पिकांची लागवड योग्य पद्धतीने नियोजन करून   कराव्यात. जेणेकरून त्या त्या पिकांच्या विक्रीच्या वेळेच्या दरामध्ये चढउतार झाला तरी  पुढील आर्थिक गणित जुळेल व अडचणी येणार नाहीत. 
 असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या दहा टक्के लाभांश वाटप शुभारंभ प्रसंगी पंधारवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये (दि. ३० जुलै)व्यक्त केले.

तसेच जगदाळे म्हणाले की,जय भवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीने दहा टक्के लाभांश दिला त्याबद्दल जिल्हा बँकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संस्थेने इमारत बांधावी त्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने कर्जपुरवठा करून देऊ तसेच त्यामध्ये सोसायटीच्या माध्यमातून खतांचा पुरवठा करणारे दुकान करावे गावाच्या दृष्टीने चांगले होईल. जिथे सहकार्य लागेल तिथे सहकार्य करण्याची  भूमिका यापूर्वीही होती व भविष्य काळात राहील .

जयभवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. पंधारवाडी (ता. इंदापूर )  संस्थेचा लाभांश वाटप १०% प्रमाणे  रक्कम पाच लाख एकोणीस हजार आठशे दोन रुपयाचा  लाभांश वाटप शुभारंभ सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे संचालक आप्पासाहेब जगदाळे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यचे जिल्हाअध्यक्ष  प्रदीप  गारटकर यांचे हस्ते लाभांश वाटप शुभारंभ पार पडला. 

यावेळी संस्थेचे चेअरमन  राजेंद्र  नलवडे, व्हा. चेअरमन  शिवाजी  भोसले  पंधारवाडी गावचे सरपंच  दिगांबर  निंबाळकर, उपसरपंच  किसन संचालक, माजी चेअरमन नारायण नलवडे, रमेश जगताप , संस्थेचे ऑडिटर  हरिदास माने, युवा नेते महेश शिर्के, श्रीनाथ सोसायटीचे व्हाईस चेअरमन तानाजी पिंगळे,  सुधीर निंबाळकर,  सचिन नलवडे, मुगुट भोसले, संजय कोकाटे, दत्तात्रय बर्गे, जालिंदर बर्गे,   दीपक रणवरे,   कैलास नलवडे, चंद्रकांत नलवडे , संग्राम नलवडे,  महेश देशमुख, सुनील नलवडे, तानाजी नलवडे ,  अरूण पारेकर, शिवाजी पारेकर, तानाजी बर्गे ,उत्तम बर्गे, जयकुमार जगताप,   बाळासाहेब नलवडे,  दत्तात्रय नलवडे, नितेश कोकाटे, संतोष भोसले,  दत्तात्रय देवकर, धनाजी देवकर, दादा देवकर
सर्व सभासद व संस्थेचे सचिव  नाना  बोराटे यांनी  सर्वांचे आभार मानले.
----------------------------------------
चौकट:
दहा टक्के लाभांश देऊन संस्थेने चांगला उपक्रम  घेतला - संस्थेचे मार्गदर्शक सदस्य प्रदीप गारटकर.

आज दहा टक्के लाभांश देऊन संस्थेने चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लाभांश मिळावा आणि उत्तम पद्धतीने काम करून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीने कर्ज पुरवठा करावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा घेतलेले पैसे वेळेवर कसे फेडता येतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा .शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे बँकेच्या धोरणा प्रमाणे योग्य वेळेत परतावा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. थकीत कर्ज रिपोर्ट बँकेत दिसेले तर बँक  कर्ज पुरवठा धोरणानुसार करू शकली नाही तर आपण कोणीच काही करू शकणार नाही. म्हणून अडचण येऊ नये म्हणून आर्थिक शिस्त ही स्वतःला लावून घेऊन प्रत्येकाने येथून पुढच्या काळात चालले पाहिजे.
close