shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकनाथ तांबवेकर यांना जादूगार पी बि हांडे सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून लोक सारथी नॅशनल गोल्डन अवॉर्ड पुरस्कार प्रदान..

श्री. एकनाथ तांबवेकर यांना जादूगार पी बि हांडे सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य 
     या संस्थेकडून लोक सारथी नॅशनल गोल्डन अवॉर्ड पुरस्कार प्रदान

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी :

आपल्या सर्वांचे परिचयाचे एक आदर्श व्यक्तिमत्व ,समाजसेवक, सहकार क्षेत्रातील सहकार महर्षी व
आदर्श व्यावसायिक श्री. एकनाथ (दादा) तांबवेकर यांना जादूगार पी बि हांडे सोशल फाउंडेशन , महाराष्ट्र राज्य
 या संस्थेकडून लोक सारथी नॅशनल गोल्डन अवॉर्ड पुरस्कार शिर्डी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

        श्री. तांबवेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थेकडून व पत्रकार बांधवांकडून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.
      यावेळी शिर्डीचे आदरणीय माजी खासदार भाऊसाहेब जी वाकचौरे ,
पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे व 
लिज्जत पापड चे सुरेशराव कोते,
 ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, जादूगर पी बी हांडे, डॉक्टर शांताराम कारंडे 
यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला.
      या राष्ट्रीय पुरस्कारासह सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .
            सर्व समावेशक सामाजिक कार्यकर्ते,  राज्याच्या व देशाच्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रातील योगदान असणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला. 
          सामाजिक कार्य Lions club International च्या माध्यमातून 1997-98 पासून सामाजिक उपक्रमामध्ये क्रियाशिल, माथाडी कामगार युनियन, अनेक पतसंस्था, शाळा, हाइस्कूल
व कॉलेजेस , 
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ,
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई ,
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप ),
आम्ही मराठी , सामाजिक आणि सांस्कृतिक राज्यस्थरीय संघटना,
 Trans Asian chember of Commerce And Industries, All India Human Rights Association(AIHRA),
आजी माजी अध्यक्ष ,उपाध्यक्ष, संचालक, सल्लागार, मार्गदर्शक, हितचिंतक म्हणून कार्यरत.
      छंद :
स्विमिंग, ड्राइविंग व सामाजिक काम इत्यादी.
       मिळालेले पुरस्कार -सन्मान : समाजरत्न गौरव पुरस्कार 2011, समाजगौरव पुरस्कार ,
महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार ,
उत्कृष्ठ समाजसेवक पुरस्कार, समाजप्रभोदन पुरस्कार ,
उत्कृष्ट संघटन व व्यवस्थापन पुरस्कार, 
सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रधान, 
मराठी साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार 2021,
 Lions clubs International Outstanding Achievement Award , 
Special Appriciation certificate, 
CHEVRON AWORD, CERTIFICATE OF APPRECIATION, 
रामचंद्र प्रतिष्ठान कडून प्रमाणपत्र, तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार 2017, 
सामाजमित्र पुरस्कार 2005 इत्यादि व अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
     तांबवेकर दादा मुंबई व नवी मुंबई येथून कार्याची धुरा सांभाळत  असून, ते घोगांव, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील आहेत.
close