हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!
इंदापूर : प्रतिनिधी दि.30/8/23
राज्याचे माजी मंञी व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण उत्साही व आनंदी वातावरणात बुधवारी (दि.30) साजरा केला.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांना पद्माताई भोसले, चिञा कोरटकर, चेतना मोटे, माधुरी माने, मौसमी कोरटकर या बहिणींना औंक्षण करून राख्या बांधल्या व निरोगी व उत्तम दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त केली.
जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि प्रेमाचे असते. याप्रसंगी या बहिणींनी उदयसिंह पाटील, किरण पाटील, मयुरसिंह पाटील या बंधूनाही राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
तसेच निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांना जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे व त्यांच्या सर्व भगिनींनी देखील राखी बांधली.

