shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक धागा मायेचा " इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राख्या बांधून केला रक्षाबंधन साजरा.

एक धागा मायेचा " इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राख्या बांधून केला रक्षाबंधन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: "एक धागा मायेचा " राष्ट्रवादी काँग्रेस महिला इंदापूर तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर यांच्या वतीने  पोलीस स्टेशन इंदापूर याठिकाणी पोलीस निरीक्षक  दिलीप पवार , पोलीस अधिकारी , सर्व पोलीस बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले
यावेळी छायाताई पडसळकर म्हणाल्या की,३६५ दिवस सतत आपली रक्षा करत असतात.आज बहिण आणि भाऊ यांचा महत्त्वाचा रक्षाबंधन हा मोठा सण आहे,तरी देखील आज आपली ड्युटी वरती कार्यरत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका इंदापूर यांच्या वतीने "एक धागा मायेचा " हा उपक्रम राबविला आहे. सर्व पोलीस बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर,उपाध्यक्ष सुनिता भोसले पिटकेश्वर.शोभा मोहिते टणणू, उपाध्यक्ष, आणि प्रतिक्षा बालगुडे उपस्थित होते.
close