shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक हॉकी या खेळ विश्वातील मेजर ध्यानचंद सर्वोत्कृष्ट खेळाडू - प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे

जागतिक हॉकी या खेळ विश्वातील मेजर ध्यानचंद सर्वोत्कृष्ट खेळाडू - प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे
इंदापूर प्रतिनिधी: 
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अंकुश लांडगे यांनी केले. विध्यार्थ्यांना त्यांनी क्रीडा दिनाविषयी माहिती दिली.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे होते. विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मेजर ध्यानचंद यांच्या आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभार राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन केले जाते.ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना 'हाॅकीचे जादूगार' म्हणून संबोधले जाते.भारताला त्यांनी 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय हॉकीचा संघ हा जगातील सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जात होता.ध्यानचंद यांनी आपला कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी हॉकी या खेळाला दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि, भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती . जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हुकूमशाहा हिटलर सुद्धा प्रभावीत झाला होता.ध्यानचंदने आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत एकूण 580 गोल केले.गोल केले होते जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने देशभर फिट इंडिया चळवळ सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणाईने ध्यानचंदला प्रेरणास्थान मानून विविध क्रीडा प्रकारात हिरारीने सहभागी होऊन महाविद्यालयाचे नाव रोशन केले पाहिजे असे आव्हान विध्यार्थ्यांना केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शीतल रणनवरे यांनी केले तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.योगिता तरंगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
close