shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या...अन्यथा .. अर्धनग्न आंदोलन

प्रतिनिधी : संजय वायकर

नेवासा : २९ /  मागील वर्षी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे  कपाशी,तुर, बाजरी,मका,व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते . सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते.अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे.त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादी मध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे. 

नुकसान भरपाई आली नसून त्वरित नुकसान भरपाई जमा करावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने दि . ७ सप्टेंबर रोजी ठिक सकाळी तहसीलदार कार्यालय समोर अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसील यांना देण्यात आले . 

 यावेळी कमलेश नवले,अक्षय बोधक,हेमंत चामुटे,राहुल कागुणे,नरेंद्र नवथर,जैद शेख,आप्पासाहेब आरगडे, प्रदीप आरगडे,स्वप्निल गरड,मनोज आरगडे,अभिजीत बोधक,तोफीक शेख, अनेक शेतकरी उपस्थित होते.
close