पोलीस अधीक्षकांकडे काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी : नितीन आढाव
नगर : २९ / मध्यवर्ती बाजारपेठेत गंज बाजार या ठिकाणी असणाऱ्या महात्मा फुले भाजी मंडईच्या वास्तूमध्ये पूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. या चौकीसाठी व्यापाऱ्यांनी टेबल, खुर्च्या, रंगरंगोटी करून देत सहकार्य केले होते. मात्र ही चौकी बंद पडली असून याला टाळे ठोकण्यात आले आहे.
अनेक व्यापारी आस्थापना बाजारपेठेमध्ये आहेत. हजारो ग्राहक रोज येथे येत असतात. व्यापारी, ग्राहक, नागरिक, महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस चौकी पुन्हा कार्यान्वयीत करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांशी काळे यांनी संवाद साधला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांनी याबाबत पोलीस प्रशासनाचे पाठपुरावा करण्याची मागणी काळेंकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर काळे यांनी शिष्टमंडळासह ओला यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
यावेळी दशरथ शिंदे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, हनीफ जहागीरदार, गौरव घोरपडे, इंजि. सुजित क्षेत्रे, रतिलाल भंडारी, आप्पासाहेब लांडगे, प्रशांत जाधव, किशोर कांबळे, आकाश जाधव, राहुल सावंत, उषा भगत, राणी पंडित, सुनिता भाकरे, मिनाज सय्यद, पुनम वन्नम, जरीना पठाण, आकाश आल्हाट, सोफियान रंगरेज, समीर सय्यद, आनंद जवंजाळ, अक्षय पाचारणे, राकेश वाघमारे, शंकर आव्हाड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले, भाजी मंडईला लागूनच सराफ बाजार आहे. कोट्यावधी रुपयांचा माल व्यापाराच्या ठिकाणी असतो. बाजारपेठेमध्ये ग्राहक येतात. यामध्ये महिला भगिनींची संख्या मोठी असते. अनेक वेळेला चुकीच्या घटना घडत असतात. या घडू नयेत यासाठी पोलिसांचा दृश्य स्वरूपातील धाक त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे. तसेच कुठली ही चुकीची घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचणे देखील आवश्यक आहे. पोलीस चौकी तात्काळ सुरू करण्याची व्यापारी, ग्राहक, नागरिकांची आग्रही मागणी आहे. यासाठी व्यापारी व काँग्रेस पक्ष सर्वतोपरी सहकार्य पोलीस प्रशासनाला करण्यास तयार आहेत.
मागणीच्या निवेदनाची प्रत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी अनिल कातकडे यांनाही देण्यात आली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यादव यांच्याशी देखील काँग्रेसने चर्चा केली असून, मार्केट यार्ड मध्ये व्यापाऱ्यांसाठी नुकतीच पोलीस चौकी कार्यान्वित केली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत चौकी पुन्हा कार्यान्वयीत करण्याबाबत लवकरच सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

