shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा. सुनिल लक्ष्मण जाधव यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

अनेक मान्यवरांची लक्षवेधी उपस्थिती

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २६ /  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथील महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक आदरणीय प्रा. सुनिल लक्ष्मण जाधव यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ शनिवार दि . २६ ऑगस्ट रोजी न्यू लॉ कॉलेज येथे संपन्न झाला .

 आदरणीय जाधव सर ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले . या गौरव समारंभाला अनेक राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधी उपस्थिती दिसुन आली .

याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे , संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री. नंदकुमार झावरे पाटील , उपाध्यक्ष श्री. रामचंद्रजी दरे , सचिव जी .डी . खानदेशे आदि मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून  प्रा. सुनिल जाधव सर यांना शुभेच्छा दिल्या .

या प्रसंगी डॉ. विवेक भापकर , डॉ. मोहनराव हापसे, डॉ. चंद्रकांत मोरे , अॅड. अभय आगरकर , श्री. जयंतराव वाघ , पालघरचे एसीपी श्री. पंकज शिरसाठ तसेच, मा. अॅड. विश्वासराव आठरे पाटील , मा. श्री. सिताराम खिलारी , मा. अॅड. दिपलक्ष्मी म्हसे , श्री. मुकेश मुळे ,कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे ,किशोर डागवाले तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते .
close