shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळभैरवनाथ देवस्थानला दक्ष पोलिस मित्रांचा चोख बंदोबस्त



प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ७ /  दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मार्फत  नगर तालुक्यातील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान  आगडगाव येथे रविवार दि .६ ऑगस्ट रोजी जावयांच्या मार्फत दिलेल्या धोंड्याच्या जेवणाला चोख बंदोबस्त राबविण्यात आला.

नगर तालुक्यातील आगडगाव येथे रविवार दि . ६ ऑगस्ट रोजी गावच्या जावयांतर्फे धोंड्यांच्या जेवणाचा उपक्रम कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी धोंड्याच्या जेवणाचा पुरण पोळीचा आस्वाद घेतला.

 यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . भाविक भक्तांना दर्शनासाठी सुरळीत व्यवस्था व इतर ठिकाणी बंदोबस्त करण्याकामी ५० दक्ष पोलीस मित्र बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते . 

देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे , व्यवस्थापक नामदेव कराळे, दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे , उपाध्यक्ष शारदा शहादेव मुंगसे, अहमदनगर जिल्हा पश्चिम अध्यक्ष रामदास गिऱ्हे , तुषार धावडे , नानासाहेब भोरडे या सर्वांच्या सहकार्याने हा बंदोबस्त व्यवस्थितरित्या पार पाडण्यात आला .
close