shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ संवेदनशील निसर्गकवी ना.धो.महानोर मातीशी नाते जुळलेले व्यक्तीः माजी आ.मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
ज्येष्ठ निसर्गकवी व माजी आ. ना.धो.महानोर यांचे निधनामुळे माती व शेतीशी नाळ जुळलेला तसेच संवेदनशिल मनाचा कवी हरपला, अशा शब्दात माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रतिक्रिया दिली.

           श्री.मुरकुटे म्हणाले की, माझे व महानोर यांचे स्नेहपूर्वक संबंध होते. त्यांनी माझ्या आग्रहास्तव अशोक कारखान्यास भेट देवून अशोक बंधारे प्रकल्पाची पाहणी केली होती. तसेच या प्रकल्पाचे कौतुक केले होते. ना.धो.महानोर हे ख-या अर्थाने माती व शेतीशी नाळ जुळलेले निसर्गकवी होते. त्यांच्या प्रत्येक कवितेला, गिताला मातीचा सुगंध होता.
            महानोर यांच्या निधनाने मराठी साहित्याची हानी झाली आहे. आपण एका संवेदनशील, सहृदयी व्यक्तीमत्वास मुकलो असल्याची भावना श्री.मुरकुटे यांनी व्यक्त केली.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close