प्रत्येक शाळा,महाविद्यालयाने रस्ता सुरक्षेपर उपक्रम घेणे काळाची गरज
श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये दि. ०३ /०८/ २०२३3 रोजी रस्ता सुरक्षा नियमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तथा विद्यार्थ्यांना मोटर वाहन कसे चालवावे, बिगर लायसन मोटरसायकल व मोटार वाहन न चालवण्याचे आणी विद्यार्थ्यांसह पालकांनी हेल्मेट घालूनच मोटार सायकल चालवावे, मोटार वाहन चालवताना रस्त्याच्या आपल्या साईटनेच व्यवस्थितपणे वाहन चालवावे, ट्रॅफिक सिग्नल बघूनच आपले वाहन चालवून व्यवस्थितरित्या खबरदारी घेण्यात यावी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीरामपूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल आदिनाथ माळी व पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियम व वाहतूक नियम मोडले गेल्यास दंडाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे व्यवस्थापक फा.थॉमस, मुख्याध्यापिका सि. सेलिन, क्रिडा शिक्षक संदिप निबे, विकास वाघमारे सर, गणेश पवार सर, सुनील बोरगे, दीपक कदम, विजू खरे, शिक्षिका स्नेहलता वाणी,सुनयना भालेराव, सुनिता सोनवणे, सेक्रेटरी स्वाती घोरपडे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री ब्राह्मणे यांनी केले.
खरेतर विद्यार्थ्यांकरीता असे उपक्रम हे प्रत्येक शाळेने घेणे आवश्यक तथा काळाची गरज असल्याचे यावेळी यावेळी अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सहयोगी:
दीपक कदम - श्रीरामपूर
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111

