प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मान
इंदापूर प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, छत्रपती कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश पांढरमिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदापूर तालुका विभागीय समन्वयक म्हणून इंदापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगणापूरकर भाग्यश्री मंठाळकर प्रशांत फडणवीस डॉक्टर संदीप पालवे वित्त वलेखा अधिकारी स्वच्छता गायके प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे विद्यार्थी विकास मंडळ संचालक अभिजीत कुलकर्णी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर सदानंद भोसले मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सन्मान चिन्ह गौरव पत्र आले.
कोरोना महामारीच्या काळात डॉ. पांढरमिसे यांनी कपड्यांपासून मास्क निर्मिती, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकांना मास्क वाटप, सॅनिटायझर निर्मिती व लोकांना सॅनिटायझर वाटप , जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, कोरोना विषयी लोकांच्या मनात असणारी भीती नष्ट करून लोकांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करून आरोग्याच्या संबंधी जनजागृती केली. त्याची दखल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक, संघनायक म्हणून आळंदी - पंढरपूर रासेयो स्वच्छ वारी स्वस्थ वारी,निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी,कोल्हापूर- सांगली पूर आपत्ती व्यवस्थापन शिबीर,नदी स्वच्छता शिबीर, हेरिटेज ऑक, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन इ. उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्य वतीन व्यवस्थापन शिबिर, नदी स्वच्छता उपक्रम, तसेच रासेयो च्या नियमित कार्यक्रम व विशेष शिबिराच्या माध्यमातून वृक्षारोपण - वृक्षसंवर्धन व जनजागृती विषयक विविध उपक्रमांमध्ये सहभाग व अंमलबजावणी यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांचा रासेयो सन्मान पुरस्कार सोहळा 04 ऑगस्ट 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहत संपन्न झाला .यावेळी इंदापूर तालुका रासेयो विभाग समन्वयक म्हणून कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रशांत दादा काटे, सचिव अशोक मोरे, उपप्रचार्य डॉ. संजय मोरे,कार्यलयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

