*बांडेवाडी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*
*पोलिस दलात भरती झालेली माजी विद्यार्थीनी आकांक्षा बांडे हीचा सत्कार..
इंदापूर प्रतिनिधी:दि 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांचे संयुक्तपणे भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभात फेरी , ध्वजारोहण , राष्ट्रगीत , ध्वजगीत , महाराष्ट्र गीत , विद्यार्थी भाषणे , ग्रामस्थ मनोगते व सुंदर हस्ताक्षर , मंथन स्पर्धा परीक्षेतील गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस दलात भरती झालेल्या आकांक्षा बांडे हीचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रसंगी मुलांची विविध विषयांवर भाषणे उपस्थित मने जिंकली. उद्योजक रामदास बांडे यांनी सर्व मुलांना प्रत्येक विषयासाठी वही व पेन भेट दिला. रोशनी परदेशी यांनी शैक्षणिक साहित्य दिले. सर्व पालकांनी मुलांना भरपूर खाऊ दिला. प्रसंगी शाळा समिती अध्यक्ष बापू राहिगुडे , रामदास बांडे , दिपक बांडे , राजू मुलाणी , सतिष बांडे , जनार्धन गावडे , सचिन बांडे , आण्णासाहेब बांडे , दयाराम भोई , संतोष डोंगरे , सुहास बंडे , रविंद्र बांडे ग्रामस्थ , युवक , महिला , मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे , शिक्षिका ललिता वाघमोडे सहकार्य केले. सुत्रसंचालन व नियोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.

